चिचडोह बॅरेज मधून पाणी पुरवठा सुरू #pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातून मौजा घाटकुळ नदीपात्रात तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच मोठ्या टाक्या आहेत. खरं म्हणजे तालुक्यातील बहुतांश पाणीपुरवठा करण्याचे घाटकुळ हेच मुख्य ठिकाण आहे. तालुक्यातील ग्रीड पाणीपुरवठा योजनेची टाकी सुध्दा घाटकुळ नदीपात्रातच आहे. मागील पंधरा दिवसांपासून चिचडोह बॅरेज मधून पाणी पुरवठा बंद झालेला होता. घाटकुळ येथुनच तालुक्यातील जवळपास ४० गावांना पाणीपुरवठा केला जातो.
चिचडोह बॅरेज मधून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे पोंभूर्णा तालुक्यात पाणी टंचाईची भिषण परिस्थिती निर्माण होऊ पाहत होती. त्यामुळे माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी आमदार सुधिर मुनगंटीवार यांना पत्र लिहून परिस्थिती अवगत करवून दिली. एका दिवसाचाही विलंब न करता आमदार सुधिर मुनगंटीवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून चिचडोह बॅरेज मधून पाणी सोडण्यास विनंती केली व जिल्हाधिकाऱ्यांना बिनाविलंब कार्यवाही करण्याच्या विनंतीवजा सुचना केल्याने चिचडोह बॅरेज मधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.