आजीबाईने मौज कर दी! आजीबाईंचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल #Socialmedia #videoviral

Bhairav Diwase
पुष्पा चित्रपटातील सामी-सामी गाण्यावर आज्जीबाईंचा भन्नाट डान्स
ट्रेनमध्ये, एसटीत, रिक्षात, टमटमध्ये, लग्नाला, वाढदिवसाला जिथं तिथं सर्वत्र पुष्पाची (Pushpa The Rise) गाणी धुमाकळू घालत आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. बरं जे या सिनेमाचे चाहतेही नाहीत, त्यांच्यातही या सिनेमाच्या गाण्यांची क्रेझ चांगलीच पाहायला मिळतेय.
इन्टाग्रामवर रील्सचा धुमाकूळ सुरु आहे. आता ‘सामी सामी’ या गाण्यावर चक्क एका गावरान आजींनी ठुमके लगावले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर आजीबाईंच्या ठुमक्यांवर फिदा झाले आहेत. डिसेंबर महिन्यात अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज सिनेमा रिलीज झाला होता.
त्याआधीपासून या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सामी सामी हे गाणं वारपलं गेलं होतं. दरम्यान, आता पुष्पा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास महिनेही उलटून गेला आहे. पण अजूनही या सिनेमाच्या सामी सामी गाण्याची क्रेख जराही कमी झालेली नाही. हा आजीबाईचा व्हिडिओ एका लग्नातला आहे. पण तो कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.