जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मूळनिवासी समाजाने जागृत होणे काळाची गरज:- गजानन पाटील जुमनाके #gondpipari #chandrapur

पारडी येथे सल्लाशक्तीचे उद्घाटन
गोंडपिपरी :- मूळनिवासी समाजावर सातत्याने शासन आणि प्रशासनाकडून अत्याचार होतोय, या अत्याचाराच्या विरोधात सामाजिक लढाई लढण्यासाठी समाजाने जागृत होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले. ते तालुक्यातील पारडी येथे आयोजित सल्लाशक्तीच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.
🆗
पुढे जुमनाके बोलताना म्हणाले कि मूळनिवासी या देशाचा खरा मालक आहे तरी सुद्धा मूळनिवासी बांधवांवर अन्याय होतोय ही लाजिरवाणी बाब आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन ही अस्तित्वाची लढाई पाहिजे.
यावेळी सामाजिक भावनेतून सल्लाशक्तीचे बांधकाम करण्यासाठी मोफत जागा देणाऱ्या ताराबाई कुळमेथे यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्राम आरोग्य सेना फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण येरमे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक ममताजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष जगनजी वेलके, डॉ. सफल कोटनाके, माजी नगरसेविका राधाताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते संजयजी सोयाम, प्रकाशजी शेडमाके, विठ्ठल मडावी, लक्ष्मण कुळसंगे, नागो मेश्राम, मधुकरजी कोटनाके, साईनाथ कोडापे, श्यामराव उईके उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पारडी व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारडी येथील समाजबांधवानी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत