Top News

पैशाचा निचरा केला, पाण्याच्या निचऱ्याचे काय ?

पैशाचा निचरा केला, पाण्याच्या निचऱ्याचे काय ?


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
मुल:- मूल नगराचा विकास विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे विशेष प्रयत्न व पुढाकारातून  झपाटयाने झाला यात दुमत नसावे. सार्वजनिक इमारती, शासकिय कार्यालये, पार्क, रस्ते, गटारे , तलावांचे सुंदरीकरण अशा कितीतरी कामांचा नजराना माजी अर्थमंत्र्यांनी मूल वासियांना दिला आहे."न भूतो न भविष्यती" असा हा विकास म्हंटला जावा हे जरी खरे असले तरी मात्र गत पंधरवाडयात बरसलेल्या पावसाने नकळत संपुर्ण नगरवासीयांना अक्षरशा हालवून ठेवले, विशेषता महामार्गाच्या कडेला अधिकृत पणे निवास करणाऱ्यांना अक्षरशा रडकुडीस आणले हा योगायोग नव्हता तर निव्वळ विकास कामे , बांधकामे मार्गी लावताना तांत्रीक चुकांची भरमार हेच कारण आहे हे ठासून सांगता येईल.


        गत पंधरवाडयात झालेली वाताहत, भेदरलेल्या गृहिणींच्या डोळयातील आसवांची भरपाई ना नगरसेवकांना, ना न.प. अधिकाऱ्यांना, ना सा.बा. विभागाचे अभियंत्यांना ना मान. सुधिरभाऊंना करता येईल.
     नगरवासीयांना रडविणारा हा न.प. व सा.बा. विभागाचा संयुक्त उपक्रम तांत्रीक चुका दुरस्ती करून किमान दिलासा देण्याकरीता लगबगीने राबविला गेला तर तेवढेच पुण्य प्रशासनास पदरी पाडून घेता येईल.


     ढगांना कितीही बरसू देत, शहरपरिसरातील तलावांची पोटं मोठी आहेत. पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे. फक्त न.प. प्रशासन कामे करताना बयताळा सारखे व सा.बा. विभागाचे अभियंते अडाण्यासारखे संसाधनांचा वापर करीत राहीली व इथेच गडबड झाली. ना चढ, ना उतार, ना सर्वे, ना डिज़ाइन..........
    आमदार सुधीरभाऊंनी नगरातील करोडोची कामे सा.बा. विभागाकडून करवून घेण्यामागे लॉजीक होते. नगरसेवकांनी फंडे वापरून आफ द रेकार्ड ठेके घेतलेच. घेऊ देत नगरवासीयांना कामासी मतलब पण तांत्रीक बाबी तरी ध्यानात घेऊन कामे केली असती तरी हा विकासकामांना लागलेला डाग टाळता आला असता.
  शहरातील विकास कामांमध्ये खास करून शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे बांधकाम करताना पैशाचा निचरा यासोबत पाण्याचा निचरा यावर गंभीरतेने विचारच झाला नाही. (क्रमश:)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने