जाहिरात... Advertisement... विज्ञापन

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान!समाज माध्यमातून फसवणुकीसाठी नवनवीन शकली लढविल्या जातात. कोरोना महामारीच्या संकटात हे फसवणूक करणारे अधिक सक्रिय झाले. फेक फेसबुक व इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करून संबंधित व्यक्तीसोबत मैत्री केली जाते. नंतर मैत्रीतून चॅटिंग व्हिडिओ काॅल हाही होतो. विशेष म्हणजे, संबंधितांकडून पैसा उकळण्यासाठी त्याला भावनिक साद घालून मजबूर केले जाते. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट ब्लॅकमेलिंग केले जाते. त्यासाठी चॅटिंगचे स्क्रिन शॉट घेतले जातात. व्हिडिओचे स्क्रिन रेकाॅर्डिंग करून ठेवले जाते. या माध्यमातून संबंधित व्यक्तीला पैसे देण्यासाठी बाध्य करतात अथवा तो मजकूर इतरत्र व्हायरल करून समाजात बदनामी केली जाईल, असे चित्र निर्माण करण्यात येते. बदनामीच्या भीतीपोटी मागितलेली पैशांची रक्कम संबंधितांकडून देण्यात येते.
असे ओढले जाते जाळ्यात......

फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुंदर मुलीचा फोटो वापरून अकाऊंट तयार केले जाते. यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. फोटोला पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणारे फसतात. पुढे मॅसेज चॅटिंग केली जाते. निवांत वेळेत हा चॅटिंगचा प्रकार सुरू राहतो. दोन दिवसांनंतर व्हिडिओ काॅलपर्यंत प्रकरण पोहोचते. व्हिडिओ काॅल केल्यानंतर पद्धतशीरपणे त्याचे स्क्रीन शाॅट किंवा स्क्रीन रेकाॅर्डिंग करून जाळ्यात ओढले जाते.
ही घ्या उदाहरणे.....

चॅटिंगचे फोटो दाखवून गंडा घातला जातो. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून काही दिवस मैत्री केली जाते. बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवरच्या बाबी शेअर करतात. यातून जवळीक निर्माण होते. नंतर काही दिवसांनी चॅटिंग केल्याचे फोटो दाखवून ब्लॅकमेल केले जाते.
मानसिक अस्थिरतेचा घेतात फायदा....

कुठल्याही कारणाने माणूस निराश असल्यास किंवा दैनंदिन कामकाजामुळे वैतागलेल्यांना हेरून त्यांच्या मानसिक अस्थिरतेचा फायदा घेतला जातो. अशा पद्धतीची फसवणूक करणारे वाढत आहेत.
स्क्रीन रेकाॅर्डिंगचा प्रकार धोकादायक........

व्हिडिओ काॅल करताना समोरची व्यक्ती नको त्या अवस्थेत राहून त्यात आपलाही सहभाग असल्याचे दर्शविते. काॅलसोबतच स्क्रिन शाॅट काढणे, चॅटिंगचे रेकाॅर्डिंग करणे असे प्रकार चालतात. यापासून प्रत्येकानेच सतर्क असणे आता गरजेचे झाले आहे.
1) अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपासून लांब रहा

2) सर्वात प्रथम प्रत्येकाने फेसबूक प्रोफाईलला टू स्टेप ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून सुरक्षित करावे.

3) तुमच्या प्रोफाईलवरील फोटो, मॅसेजेस इतर व्यक्तींना दिसणार नाही. ते डाऊनलोड करता येणार नाही.

4) बहुतांश प्रकरणात फेक प्रोफाईलसाठी संबंधितांचे फोटो व नाव वापरले जाते.

5) फेक प्रोफाइल तयार करण्याचे प्रमाण वाढले.


:- सायबर सेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत