आष्टा येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी घेत आत्महत्या #suicide


पोंभुर्णा:-  पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील शेतकऱ्यांने आज दि. २७ जुलैला ९ वाजताच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव अरुण मारोती बोडेकर असे आहे. आत्महत्येच कारण अद्याप कळू शकले नाही. 
 
 पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करून प्रेत परीवाराला सुपुर्द करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे आष्टा गावात शोककळा पसरली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत