Top News

ताई...! तुमच्या धाडसाला सलाम

गर्भवती महीलेचा उपचारासाठी डोग्यांने दोन पुर पार केले

चंद्रपूर:- प्रसूतीसाठी गर्भवती महीलेला रूग्णालयात दाखल व्हायच होतं.मात्र पुराने दोन ठिकाणी मार्ग अडविला होता.
अश्या स्थितीत आशा वर्कर महीलेने धाडस दाखविलं. गर्भवती महिलेला सोबत घेत आशा वर्करने डोंग्याने मार्गातील दोन पुर पार केले अन ग्रामीण रूग्णालयात पोहचविले.


गोंडपिपरी तालुक्यातील नवीन पोडसा येथील पिंकुताई सुनील सातपूते या गर्भवती होत्या.त्यांना प्रसुतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रूग्णालयात भरती व्हायचे होते.मात्र मार्गावरील दोन नाल्यांना पुर आला आहे.त्यामुळे मार्ग बंद आहे.अश्या स्थितीत सातपूते कुटुंबिय चिंताग्रस्त झाले. गावातील आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्या मार्गदर्शनात पिंकुताईला आरोेग्य मार्गदर्शन सुरू होते.
पण  कुठल्याही स्थितीत तिला ग्रामीण रूग्णालयात भरती होणे आवश्यक होते. अश्या कठिण स्थितीत आशा वर्कर संगीता ठाकूर यांनी गर्भवती महीलेला सोबत घेत डोंग्याने प्रवास सूरू केला.वेडगाव ते सकमुरच्या समोर पर्यत डोंग्याने प्रवास करित त्या शेवटी गोंडपिपरीला पोहचल्या.तिथून महीलेला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले.आशा वर्करचा धाडसाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने