प्रेमासाठी मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आईची केली हत्या #chandrapur #gadchiroli #murder #aheri


गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या ठिकाणी घटना घडली आहे. आईकडून तिला सतत होणारी रोकटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
अहेरी येथील निर्मला आत्राम हिचे पती पोलीस दलात असताना वीस वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. यानंतर निर्मला यांनी स्वतःच्या मुलीसह अहेरी येथे राहून घरकाम करून स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह केला. आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी उर्मिलाला एका तरुणासोबत संशयास्पद अवस्थेत फिरताना पाहिले. यावेळी तिने आईचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं तर घरात निर्मला या मृतावस्थेत दिसल्या.
पोलिसांना उर्मिलावर संशय आला त्यानंतर त्यांनी तिची कसून चौकशी केली असता उर्मिलाने आपल्या प्रियकर रुपेश येनगंदलवारला सोबत घेऊन आईची गळा दाबून हत्या केल्याचं कबुल केलं. मृत आई निर्मला आत्राम यांना उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या. हे उर्मिलाला अजिबात आवडत नव्हते. म्हणून तिने प्रियकर रुपेश येनगंदलवार याच्या मदतीने आईची गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत