Top News

सरदार पटेल महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते पलक शर्माचा सत्कार #chandrapur


भद्रावती येथे कराटे स्पर्धेत पटकाविले होते ३ पदक
चंद्रपूर:- ‌कराटेचे भीष्म पितामह दाई सेन्साई डॉ. मोसेस तिलक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व एलन तिलक शितोया कराटे स्कूल यांच्या संयुक्त वतीने मोसेस कप २०२२ नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन २४ जुलैला स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
या नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पलक शर्मा हिने ३ पदक मिळवून दमदार अशी कामगिरी केली. या पदकात १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदकांचा समावेश आहे. पलक शर्मा हि सरदार पटेल महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षाच शिक्षण घेत आहेत. व सरदार पटेल महाविद्यालयात कराटे प्रशिक्षण वर्ग घेत असते.

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरदार पटेल महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांच्या हस्ते पलक शर्माचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थीनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन, ब्रिटिश गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण कायम रहावी तसेच नव्या पिढीला या हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी असे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सर म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, NCC Cadet तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने