चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात इसमाचा स्वतःवर चाकू हल्ला #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात एका इसमाने स्वतःवर चाकू हल्ला केल्याने मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आयुक्त राजेश मोहिते दुपारी कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात गेला.
कक्षात लक्ष्मण पवार आणि आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले. भेदरलेल्या आयुक्तांनी चपराशी आणि सुरक्षारक्षकांना जोराने आवाज दिला. यावेळी आतील दृश्य पाहून सर्व जण घाबरुन गेले. याबाबत तातडीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं.
 पोलिसांनी घटनास्थळी येत जखमीला ताब्यात घेतलं. लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून सिटी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे. या प्रकारामुळं मनपात खळबळ उडाली आहे. सोबतच या प्रकरणाची चर्चा शहरासह जिल्हाभरात होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत