Top News

जि. प. उच्च. प्राथ. शाळा बोर्डा येथे प्रत्यक्ष EVM मोबाईल चा वापर करून लोकशाही पद्धतीने घेतली बालपंचायत निवडणूक #chandrapur




चंद्रपूर: निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल EVMचा वापर मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली.
बालपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने तसेच बाल पंचायती मधील मंत्री दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे नव्याने दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी जि.प.उच्च प्रा. शाळा, बोर्डा येथे लोकशाही निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार करणे,प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.
शालेय बालपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक सुनील गेडाम सहाय्यक शिक्षक प्रशांत काटकर , अशोक मुसळे , संजय झोडे,यांचे उपस्थितीत हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.
यावेळी, मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी कू.नालंदा बोथले समूदाय समन्वयक सचिन डोर्लिकर यांचे सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शपथ ग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी,अतिशय शांतता ठेऊन तसेच नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने