Top News

जुनगावची पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे "ऑनफील्ड" #Chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- सततच्या अतिवृष्टीसह गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे वैनगंगेला पूर आला आहे. त्याचमुळे वैनगंगेची उपनदी असलेली पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगाव येथील स्थानिक नदी दुथडी भरून वाहत आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरूनच पाणी वाहत असल्याने जुनगावचा संपर्क तुटला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार आज भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.

जुनगावचे मुख्य रहदारी मार्ग पाण्याखाली गेल्याने त्यांनी बोटीने गावात जाऊन गावकर्‍यांशी सविस्तर चर्चा केली. येत्या काही दिवसांत पूर ओसरेल पंरतू यादरम्यान काही अडचणी आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्हाला त्वरित कळवावे याशिवाय नदीपुलावरून पाणी वाहत असतांना पाण्यातून जाणे टाळावे. असे आवाहन याप्रसंगी त्यांनी गावकर्‍यांना केले.
यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणचा संपर्क तुटलेला होता त्यामुळे आरोग्य सुविधेचा अभाव होता, आज भेटीदरम्यानच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत आणून गावातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण केले. यावेळी अनेकांवर औषधोपचार ही करण्यात आला.

तसेच, काही दिवसांपूर्वी येथील स्व. ईश्वर श्यामराव ठाकूर यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतकाच्या कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले प्रसंगीच त्यांच्या आप्तांना आर्थिक सहाय्य ही केले.
याप्रसंगी, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख, तालुका महामंत्री हरीश ढवस, जेष्ठ नेते पांडुरंग पा. पाल, खुशाल भोयर, अमोल पाल, राजेश मोरपाका, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह आदि मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने