Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

चंद्रपूर येथे सिनिअर व ज्युनिअर सेस्टोबॉल मुले व मुलीची जिल्हास्तरीय स्पर्धा व विदर्भस्थरीय निवड चाचणी

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा सेस्टोबॉल असोसिएशन चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर मध्ये सिनिअर व ज्युनिअर सेस्टोबॉल मुले व मुलीची जिल्हास्तरीय स्पर्धा व विदर्भस्तरीय निवड चाचणी दिनांक 21/08/2022 रोजी ठीक सकाळी 09:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, गंजवार्ड जवळ, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

      चंद्रपूर जिल्हा सेस्टोबॉल असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. सुनील निखाडे, सचिव श्री. मिलिंद चौधरी व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेणार आहे.
     
    सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना आधार कार्ड ची 3 प्रत व 3 फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे चंद्रपूर जिल्हा सेस्टोबॉल असोसिएशन चंद्रपूर संघात निवड केली जाईल व निवड झालेल्या संघ गडचिरोली येथे 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2022 रोजी दुसरी विदर्भस्तरीय सीनिअर व ज्युनिअर स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.
   
इच्छुक खेळाडूंनी सहसचिव मयूर बोनमपल्लीवार 8421726919, अमोल ठाकरे 9579302952, प्रफुल मेश्राम 7972633934, चेतन ईदगुरुवार 7709065833, बंडू डोहे  7066666105, अमित खोब्रागडे 9588679187, सुरज बोरघरे 8698205107 यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणी चे नियमः
जूनियर ( U19 ) खेळाडूची जन्मतारीख ही 02/01/2004 च्या समोरची असावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत