Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

खाते वाटपानंतर मुनगंटीवार यांचे उद्याला प्रथमच पोंभुर्ण्यात आगमन #chandrapur #pombhurna


भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते स्वागतासाठी सज्ज
पोंभुर्णा:- दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय खात्याची जबाबदारी देण्यात आली. खाते वाटपानंतर  दिनांक २० ऑगस्‍टला रोजी प्रथमच पोंभुर्णा आगमन होत आहे.
  भव्य नागरी स्वागत दिनांक 20/08/2022 ला शनिवारी दुपारी 04:00 वाजता आ. सुधीर मुनगंटीवार वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री (महाराष्ट्र), भाजप जिल्हाध्यक्ष श्री.  देवराव दादा भोंगळे चंद्रपूर यांचे पोंभुर्णा शहरात आगमन होत आहे. तरी सर्व जनतेने व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा पोंभुर्णा यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत