ग्रामपंचायतीची ग्रामसभा गैरव्यवहारांनी गाजली #yawatmal


युवकांनी केली पोल खोल; भर सभेत रडल्या सरपंचा
यवतमाळ:- झरी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत अनभीज्ञ कारणानी नेहमीच चर्चेत होती. काल दि. 18 ऑगस्टला वार्ड क्र.1 मधील हनुमान मंदिरात ग्रामसभा घेण्यात आली. ही ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रामपंचायतीच्या कारभारावरून प्रश्न विचारत चांगलीच गाजली.
अडेगाव येथील ग्रामसभा वार्ड क्र. 1 हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी अडेगावच्या सरपंचा सिमा लालसरे होत्या. ग्रामविकास अधिकारी गोवरकर तथा सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली. यात 300 ते 350 महिला पुरुष गावकऱ्यांची उपस्थिती होती. गोवरकर यांनी ग्रामसभेचे विषय सांगून ग्रामसभेला सुरवात केली.
सदर ग्रामसभा सुरु झाल्यापासुन गावातील तरुणांनी विविध मुद्यावरून सरपंच यांना चांगलेच धारेवर धरले. गटार सफाईचे काम पूर्ण होण्याआधी दिलेला धनादेश, वॉटर फिल्टर मधील एका फिल्टर चे सामान दुसऱ्या फिल्टरला लावून सामानाची काढलेली बिले, पानी फिल्टर मधील पैशाचा हिशोब, गावाला अंधारात ठेवून घेतलेली माईन्सची जनसुनावणी, संबंधित माईन्स तर्फे गावला कुठलीही मदत होत नसताना सरपंचानी घेतलेली कंपनीची बाजू, अश्या विविध प्रश्न गावातील युवकांकडून विचारण्यात आली.
परंतु कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रा.पं. प्रशासनास देता आले नाही व कुठल्याही कामकाजाचे दप्तर सभेत दाखवले नाही. विशेषता सरपंचानी वेळोवेळी विरुद्ध ग्राम पंचायत सदस्य गावातील विकास कामाला सही देत नसल्याचा त्या मुळे निधी वापस जात आहे असा गावात खोटा प्रचार केला होता. मात्र गावकाऱ्यांनी अश्या सदस्याची नावे जाणण्याचा आग्रह धरला. आणि हे सगळं खोट असल्याच निष्पन्न झाले. आणि सरपंच याची पोल खोल झाल्याने सरपंच ह्या भरसभेत रडायला लागल्या. मात्र नागरिकांना त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाही. मात्र वेळेचा बहाणा करत सभा संपल्याची जाहीर केले. त्यामुळे गावांत विविध चर्चेला उधाण आले.
या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी, व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत