Top News

प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे रोगनिदान शिबीर संपन्न #chandrapur #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- आझादी का अमृत महोत्वाचे औचित्य साधत जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवगळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव,आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव यांच्या सहकार्याने,समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स,नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर,व तसेच कोविडशिल्ड लसीकरण, सहकार्य मानव विकास कार्यक्रम,हेल्थ एज इंडिया यांचे लाभले.
या शिबिरात एकूण 77 नागरिकांनी तपासणी करिता सहभाग घेतला असून तपासणी अखेर शस्त्रक्रियेकरिता 21 रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय व वर्धा येथे येत्या आगस्ट 29 आगस्ट रोजी पाठविण्यात येणार आहे शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल,
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा जाणे येणे प्रवास राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात येईल, शिबिर यशस्वी करण्यासाठी आशासेविका चे विशेष सहकार्य लाभले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई राठोड,किरण पांचाल,कार्यक्रम यशस्वीतेकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेन्भे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर यावेळी उपस्थित प्रा.आरोग्य केंद्र शेणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.आबीद शेख,डॉ.विद्या खानसोळे प्रा.आरोग्य केंद्र पाटण येथील डॉ.कविता शर्मा,आरोग्यदूत स्वयंसेवक गोविंद गोरे,तसेच प्रहार चे रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता अथक परिश्रम घेतले असून पाटण,शेणगाव येथील कर्मचारीवृंद यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने