विरूर स्टेशन ठरतेय अवैध प्रवासी वाहतुकीचे केंद्र!

राजुरा:-:पोलीस प्रशासन आणि नियमाबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक व अवैध वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधुर आहेत की जणू काही वाहतूक पोलिसांकडून खाजगी वाहतूकदारांना व अवैध वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही असे चित्र विरूर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हार्दिक दिसून येत आहे, मात्र पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परीसरात होत आहे.
राज्याच्या सीमेलगत असलेल्या लक्कडकोट टोल नाका वाचविण्याकरिता रात्री १० वाजताच्या नंतर डुकराच्या गाड्या त्याचप्रमाणे नागपूर ते हैदराबाद जाणारी ट्रॅव्हल्स आणि गडचिरोली ते छत्तीसगडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स लोकांनी गच्च भरलेल्या ट्रॅव्हल्स विरूर पोलीस स्टेशनच्या समोरून जातात आणि रेतीचे ओव्हरलोड असलेले हायवा सुद्धा या मार्गाने जातात. अवैध ताांदुळाची देवाणघेवाण होत असते.
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मुख्य मार्गावर असलेल्या विरूर पोलीस स्टेशनच्या समोरून अवैध प्रवासी वाहतुकीला अवैध धंद्याला आळा घालून संबंधित वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी परीसरात जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत