कर्मचाऱ्या अभावी रुग्ण दगावल्यास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार #chandrapur #sindewahi

ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा
सिंदेवाही:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,वासेरा येथिल रिक्त पदे भरण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना तालुका सिंदेवाही यांनी दिनांक 10 जुन 2022 ला बेमुदत डरकाळी धरणे आंदोलन केले होते.त्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन माहे सप्टेंबर 2022 पर्यंत उर्वरित सर्व रिक्त पदे भरण्यात येथील असे तोंडी व लेखी आश्वासन देऊन आंदोलन कर्त्यांना आंदोलन माघार घेण्यास विनवणी केली.त्याच विनंतीचा सन्मान राखत आंदोलन कर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.मात्र वास्तविकता बघता प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही सक्षम आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही.
अर्थातच जनतेची समस्या ही महत्वाची नसल्याचे संबधित अधिकारी यांच्या कार्यशैली वरून कळते आहे.MBBS वैद्यकीय अधिकारी नाही.अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच वैद्यकीय अधिकारी यांच्या भरोसावर ठेवले आहे.तसेच उर्वरित रिक्त पदांची यादी सोबत जोडलेली आहे.तेव्हा ऑल इंडिया पँथर सेना मागील आंदोलनात संबधित अधिकारी यांच्या विनंतीचा सन्मान राखण्यात आला.पण मर्यादा ओलांडल्यामूळे थेट इशारा देत आहे की यापुढे होणाऱ्या उद्रेकास सर्वश्वी जबाबदार संबंधित अधिकारी व प्रशासन असेल. आपल्या माहितीस्तव सादर...अश्या स्वरूपाचे निवेदन ठाणेदार,पोलीस स्टेशन सिंदेवाही मार्फत पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतांना आक्रोश खोब्रागडे तालुकाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना, तथागत कोवले, युवाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना,सुनील गेडाम महासचिव ऑल इंडिया पँथर सेना, विरेंद्र मेश्राम प्रसिद्धीप्रमुख,तेजेंद्र नागदेवते युवा उपाध्यक्ष तसेच ऑल इंडिया पँथर सेना तालुका सिंदेवाहीचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत