Click Here...👇👇👇

हरलेली चंद्रपूर लोकसभेची जागा मिळवणारच! भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- लोकसभा मतदार संघाच्या गत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चंद्रपुरची जागा गमावली. आता मात्र त्याची पूनरावृत्ती कदापि होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या जागेवर विजयाची जबाबदारी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यावर टाकली आहे. त्यांच्या समर्थ नियोजनातून आम्ही ही जागा मिळवणार म्हणजे मिळवणारच, असा निर्धार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केला. शुक्रवार, 2 सप्टेंबरला जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी आ. बावनकुळे चंद्रपुरात आले होते. त्यानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता त्यांनी पत्रपरिषद घेतली.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खा. अशोक नेते, आ. बंटी भांगडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष (शहर) डॉ. मंगेश गुलवाडे, माजी आ. संजय धोटे माजी आमदार, भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते.
आ. बावनकुळे म्हणाले, चंद्रपूर लोकसभा मतदार संघ आणि बुलढाणा मतदार संघासह 16 जागेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रपूरची जागा आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर आहे. या जागेच्या नियोजनाची जबाबदारी आणि संपूर्ण प्रभार मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यावर असून, येत्या 22 ते 24 सप्टेंबर रोजी ते चंद्रपुरात मुक्कामी असणार आहेत. त्यावेळी ते 21 कार्यक्रम घेतील. त्यापुढेच्या 18 महिन्यातही सहा वेळा त्यांचा प्रवास होणार आहे. अत्यंत सुक्ष्मपणे योजना आखून त्याबाबतचा वारंवार आढावा ते घेणार आहेत. कारण ही जागा कुठल्याही परिस्थिती भाजपाला परत मिळवायचीच आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच हे स्वप्न आहे आणि आम्ही ते पूर्ण करणारच. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात आठ वर्षात केंद्राच्या योजनेतून मोठा विकास झाला असून, तो जनतेपर्यंत आम्ही पोहचवू. संघटनात्मक आढावा घेतला जाईल, असे आ. बावनकुळे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांची भेट मैत्रीच्या संबंधातूनराज ठाकरे यांच्याशी माझे आणि अनेक भाजपा नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्याशी होत असलेल्या भेटी त्याच संबंधातून आहेत. सध्या श्री गणेशोत्सव सुरू आहे. त्यावेळी एकमेकांच्या घरी आम्ही जात असतो. भेट झाली म्हणजे युती झाली असे होत नाही, असे मत आ. बावनकुळे यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.