Top News

साडेसात लाखांच्या मुद्देमालासह 11 जुगार्‍यांना अटक #Gamblers


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
राजुरा:- शहरातील अवैध जुगार चालक ईश्‍वर उर्फ गोलू ठाकरे हा जोगापूरच्या घनदाट जंगलात जुगार अड्डा चालवत असून, नियमितपणे चालणार्‍या या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून घातलेल्या धाडीत 3 लाख 92 हजार 110 रुपये रोख रकमेसह एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 11 जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.
राजुरा येथील गोलू उर्फ ईश्वर ठाकरे हा इसम इंदिरानगर जवळील जोगापूर जंगल शिवारात जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांच्या नेतृत्वात तिन पथके तयार करून मंगळवार, 15 नोव्हेंबरला पहाटे जोगापूर जंगल शिवारात चालू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून 11 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून नगदी 3 लाख 92 हजार 110 रुपये, 42 हजार रुपये किंमतीचे पाच भ्रमणध्वनी, 3 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या सहा मोटार सायकली व इतर जुगाराचे साहीत्य असा एकुण 7 लाख 59 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
🏥
या प्रकरणात हाफीज रहमान खलील रहमान (53, रा. गुरूनगर, विरान टॉकीज रोड, वणी, जि. यवतमाळ), अनिल तुळशिराम खोब्रागडे (54, रा. बाबुपेठ वार्ड क्रमांक 3, चंद्रपूर), सैफुद्दीन उर्फ सैफु नन्ने शहा (55, रा. रामपूर भवानी मंदिराजवळ, राजुरा), दिपक गणपत पडोळे (38, रा. अंचलेश्‍वर वार्ड, चंद्रपूर), राकेश गणपत पडोळे (50, रा. अंचलेश्‍वर वार्ड, चंद्रपूर), मनोज उध्दव कायडींगे (42, रा. बाबापूर सास्ती, राजुरा), गणेश रामदास सातफाडे (35, रा. गडचांदूर), प्रदिप दिपक गंगमवार (41, रा. महाकाली वार्ड, चंद्रपूर), बाल्या उर्फ आनंद किसन बट्टे (34, रा. इंदिरानगर वार्ड, राजुरा), शंकर विश्‍वनाथ पटेकर (56, रा. हनुमान मंदिराजवळ, सास्ती, राजुरा), इजाज खान अजीम खान (41, रा. मंदिना मस्जीदजवळ, तुकूम चंद्रपूर) व जुगार भरविणारा गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे (29, रा. पेठवार्ड, आंबेडकर चौक, राजुरा) यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध राजुरा पोलिस ठाण्यात कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींना पुढील पुढील कार्यवाहीकरिता राजुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
🏥
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, मंगेश भोयर, संदिप कापडे, पोलिस अंमलदार स्वामीदास चालेकर, सुरेंद्र महतो, चंदु नागरे, अजय बागेसर, गणेश मोहुर्ले, प्रशांत नागोसे आदींनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने