Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

शेतात लावलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur #Korpana #Gadchandur


पुरावा नष्ट करण्याचा आरोपींकडून प्रयत्न
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बिबी येथील माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांच्या शेतात रानटी जनावरांना मारण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बापुजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत्यू झाला हे कळताच गुन्हा लपविण्यासाठी आरोपींकडून मृत शेतकऱ्याला दुसऱ्या शेतात नेऊन टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. हि घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
बापुजी मारोती कन्नाके च्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता पहाटेला गेले होते . शेतात जाताना कि परताना शॉक लागला हे अजून कळू शकले नाही. बिबी परिसरात सध्या वाघ व‌ व रानटी डुकरांची दहशत आहे. वन्यप्राण्याकडून संरक्षणासाठी शेतकरी असे जीवघेणे उपाय वापरतात. मात्र, यामध्ये विनाकारण बापुजी कन्नाके या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.
या प्रकरणात सध्या शेतात काम करणाऱ्या देवेंद्र सुरेश माणुसमारे ३२ या. बिबी या शेतमजुराला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. शेती मालक संतोष पावडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. उपविभागीय पोलिस अधीक्षक सुनीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत