Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

विरुर स्टेशन येथे सत्कार समारंभ, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यक्रम संपन्न.

पवित्र जोगापुर यात्रेकरिता भाविकांना एक महिना विनामूल्य परवानगी- मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपूर


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टे.
विरुर:-  दि. 14 नोव्हें. रोजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते भाजपा जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे करण्यात आले. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना प्रधानमंत्री योजने अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील व विरुर स्टेशन येथील नागरिकांचे समस्या सोडविण्याकरिता जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या सेवेत राहील असे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


    राजूरा वनपरिक्षेत्रातील पवित्र जोगापुर यात्रेकरिता भाविकांना एक महिना विनामूल्य परवानगीचेही घोषणा करण्यात आली. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार विरूर (स्टे.) येथील नियोजित कार्यक्रमाला आले असता, जोगापूर देवस्थान यात्रेच्या दर्शनार्थींनी  मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र जोगापुर यात्रा विनामूल्य करण्याची मागणी केली. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाविकांची मागणी ऐकताचं वनविभागाला  ही यात्रा एक महिना विनामूल्य करण्यासाठीचे तात्काळ निर्देश दिले.


   त्याप्रसंगी माजी आमदार ऍड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जि. प. सभापती सुनील उरकुडे, माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, प्रशांत घरोटे, माजी नगरसेवक हरजित सिंग, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, मोतीराम डोबलवार तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भाजपा कार्यकर्ता सर्कल अध्यक्ष सतीश कोमरवेल्लीवार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तिरुपती नल्लाला, विरुर स्टेशन शहर अध्यक्ष भीमराव पाला, प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रामावतार सोनी, हितेश गाडगे, दिनेश कोमरवेल्लीवार, गुड्डू शेख, कित्ती बावेजा तसेच अनेक भाजपा कार्यकर्ता व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत