Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ग्रामपंचायत नोकारी खु. येथे वामन तुरानकर यांची दुसर्‍यांदा उपसरपंच पदी बिनविरोध निवड.

ग्रामपंचायत नोकारी खु. येथे वामन तुरानकर यांची दुसर्‍यांदा उपसरपंच पदी बिनविरोध निवड.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- नोकारी खु. ग्रामपंचायत मध्ये मागील 15 वर्षांपासून भाजपाचे बहुमताचे सरकार आहे.  हे  आदिवासी बहुल गाव आहे येथे जाती, धर्म, गरीब, श्रीमंत हा भेदभाव विसरुन   निरंतर विविध सेवा व विकास  कार्य करण्यात येते याचि पोचपावती म्हणून भा.ज पा.ला मतरुपी प्रेम लाभले आणि सात सदस्य  निवडून दिले व दि.11/11/2022 ला ग्रा.प नोकारी खु. येथे झालेल्या उपसरपंच निवडणुकीसाठी दोन अर्ज प्राप्त  झाले एक अर्ज परत घेतल्यामुळे वामन तुराणकर यांची बिनविरोध  निवड करण्यात तसेच परीसरात नेतृत्वात लढलेल्या मानोली खु. येथे भाजपाचे गणेश नैताम तर ईसापुर येथे भाजपाचे दिनेश ठाकरे आणी भेंडवी येथे भाजपाचे सुनील आत्राम यांची उपसरपंच पदी विजयी झाले.
    यावेळी जंगु सोमा आत्राम ग्रा.प सदस्य, शिवमूर्ती गायलाड ग्रा.प सदस्य, लताताई रामकिसन उईके ग्रा.प सदस्य, ममता ईसांबर नागोसे ग्रा.प सदस्य, लक्ष्मीताई नागेश परचाके ग्रा.प सदस्य, व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ड्रेस साहेब, तर निरीक्षक  म्हणून नेवारे साहेब यांणी काम पाहीले तसेच यावेळी सुनील उरकुडे माजी सभापती, अरुणजी मस्की, मंगेशभाऊ श्रीरामे, सुरेशभाऊ रागीट, मारोती येरमे, खंडेराव सलाम लींगु पा. येरमे, कर्णु पा.आदे, वासुदेव मडावि, लक्ष्मण नैताम, आनंदराव बतकी, योगनाथ बतकी, नितीन पाचभाई, नामदेव गिरमाजी , राजकुमार  छत्री, अरविंद राॅय, किशोर भोयर, मारोती पीलावान, सूर्यभान दीगोरे, तुषार कलोडे , रोशन ढोले, व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत