Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

खेळता-खेळताच जीव गमावला #chandrapur #Nagpur #death


क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला
नागपूर:- लहान मुलं अनेकदा नकळतपणे असे खेळ खेळतात जे त्यांच्या जीवावरही बेततात. बऱ्याचदा घरच्यांना याची पुसटशी कल्पनाही नसते की त्यांचं मुल स्वतःहून मृत्यूच्या दारात जात आहे आणि क्षणात विपरित काहीतरी घडतं.
नागपूरमधून एक अशीच अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात गेटचा नट निघाल्याने एका चिमुकल्याचा जीव गेला आहे. हा मुलगा घराच्या अंगणात असलेल्या स्लायडिंग गेटवर खेळत होता. अंगणातील गेटवर झुलताना ही घटना घडली.
यात रियांश टांगले नावाच्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गेटवर झुलताना गेटचा लोखंडी नट निघाला. यामुळे गेट अंगावर पडल्याने रियांश गंभीर जखमी झाला. यानंतर तात्काळ उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मेयो रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी रियांशला मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे टांगले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत