Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

मनोरुगण युवकाने तिन वाहनांच्या फोडल्या काचा #chandrapur

भद्रावती:- भद्रावती (Bhadrawati) शहरातील श्रीकृष्ण नगर येथील एका मनोरुगण युवकाने परिसरात उभ्या असलेल्या तिन वाहनांच्या काचा फोडल्या. यात गाडीमालकांचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना दिनांक १६ नोव्हेंबरला रोज बुधवारला दुपारच्या सुमारास घडली.
आरोपी युवक हा थोडासा मनोरुगण असल्याचे समजते. शहरातील श्रीकृष्ण नगर (Shrikrishn nagar) परिसरातील एका खासगी आयटीआय (ITI) जवळ दोन स्कुलबस तथा एक जिपकार उभी होती. यावेळी हा युवक तेथे बसुन होता. अचानक या युवकाने काहीही कारण नसतांना या वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. कोणाला काही कळायच्या आत या युवकाने वाहनांच्या काचा फोडून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले.
सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात (bhadrawati police) करण्यात आली असुन पोलिसांनी घटनेतील आरोपी रोहित प्रभाकर लिपटे रा. श्रीकृष्ण नगर भद्रावती यांचे विरोधात गुन्हा (crime) दाखल केला. भद्रावती पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत