Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सुप्रिया सुळे यांचा अवमान होतो आणि इतर महिलांचा होत नाही का?:- सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजपा #chandrapur


चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार जे आक्षेपार्ह बोलले, त्याचे मी समर्थन करणार नाही. उलट कोणत्याही महिलेचा असा अवमान व्हायला नको, असे माझे मत आहे; परंतु सुळे यांना कुणी काही बोलले, तर त्यांचा अवमान होतो. मग इतर महिलांचा अवमान होतो त्या वेळी कुणी काहीच कसे बोलत नाही?, असा प्रश्न भाजप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ''महाविकास आघाडी सरकारने निश्चिती न करताच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला १ मास कारागृहात टाकले. वास्तविक केतकी हिने ते लिहिलेच नव्हते. तिला यात अडकवण्यात आले. स्वप्ना पाटकर तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्यांना किती घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या. त्यावेळी त्या महिलांचा अवमान झाला. असेही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत