Top News

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हायला हवी #chandrapur

भाजप नेते चित्रा वाघ यांचे प्रतिपादन
चंद्रपूर:- संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत असतांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न, विशेषतः महिलांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. या दौऱ्यातील संपर्कामुळे जनतेला सरकार कडून असलेल्या अपेक्षा या देखील कळत आहे. भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने दारूबंदीचा विषय सखोल अभ्यास करून मांडला आहे. दारूचा फटका महिलांनाच सहन करावा लागतो. यात दुमत नाही. महिलांच्या या संदर्भातील तक्रारी लक्षात घेतल्या तर चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी झाली पाहिजे, पण ती प्रभावी असावी. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे संवेदनशील नेते आहेत, यासाठी आपण त्यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करू असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रपरिषदेत रविवार (13 नोव्हेंबर)ला चंद्रपूर येथे केले.
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, राज्य का. सदस्य रेणुका दुधे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, संजय गजपुरे, महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, भाजप नेते वंदना आगरकाटे, लक्ष्मी सागर व वैशाली जोशी यांची उपस्थिती होती.
चित्रा वाघ म्हणाल्या, शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर असते. ग्रामपंचयतच्या निर्णयावर दारूबंदी होतांना बघितले आहे. महिलांचा कल दारूबंदी लागू करण्याकडे आहे. असे या दौऱ्यात निदर्शनास येत आहे, असेही त्या म्हणाल्या. सावलीच्या एका महिला पदाधिकाऱ्यांने दिलेले निवेदन घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनाही इलेक्टिव्ह मेरिट आवश्यक

सभागृहात सर्वधिक महिला आमदार भाजपचे आहेत. इथे तिकीट व पद कुणाला द्यावे हे सांगावे लागत नाही. काम करणाऱ्यांना योग्यतेनुसार संधी दिली जाते. त्याच सोनं करता आलं पाहिजे. फक्त महिला आहे म्हणून तिकीट द्यावं असं होऊ शकत नाही. इलेक्टिव्ह मेरिट आवश्यक आहे. महिलांनी याकडे लक्ष पुरवावे. भाजपात लॉबिंग नाही, जाणकार नेते आहेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
त्या महिलांमुळे सरकारला मिळते मार्गदर्शन

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सक्षमपणे कार्य करीत आहे. याच दौऱ्यात एकाच विषयावर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या महिलांची भेट घेत आहे. अश्या महिला 'ओपिनियन मेकर्स' असतात. त्यांच्यामुळे सरकारला मार्गदर्शन मिळते. त्यांचे विविध विषयांवर मत घेऊन ते सरकार पुढे मांडणे हा या महाराष्ट्र दौऱ्याचा उद्देश असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने