Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

महिला व मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही:- सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजपा #chandrapur


चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना द एनडी हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या, 'माझी काम करायची पद्धत वेगळी आहे. आता आपण सत्ताधारी पक्षात आहोत, त्यामुळे विरोध करण्यापेक्षा आपण आपल्या भागातील सर्वसामान्य जनतेच्या व महिलांच्या समस्या आपल्या नेत्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणे जास्त गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनास्थळी त्वरित पोहचा व त्या विषयाची इत्यंभूत माहिती जिल्ह्यातील पोलिस ठाणे, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ना घेऊन त्यावर रीतसर कार्यवाही होण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर भाजपा महिला मोर्चा  पाठपुरावा करा. व महिला व मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे यावेळी सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

'राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहे, त्याची पूर्ण माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे व हे कार्य महिला सर्वात चांगल्या पद्धतीने करू शकतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या हि पुरुषांच्या संख्यांच्या बरोबरीने असली पाहिजे असे नियोजन करा,' असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
पुढे बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यात राज्यात महिलांची सुरक्षा आणि त्यांचे बळकटीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्यमान सरकार हे मातृशक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तत्कालीन महाविकआस आघाडी सरकारने महिलांच्या विकसासाठी कुठलेही ठोस पावले उचलले नाही. शिंदे - फडणवीस सरकारने अनेक विकासाभिमुख योजना राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. उध्दव ठाकरे यांचे सरकार केवळ अभासी होते. शेतकरी, शेतमजुर, महिला यांच्या प्रश्नाबाबत विद्यमान सरकारने ठोस निर्णय घेतले आहेत. खरीप हंगामात आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदतीचा हात दिला. आज महाराष्ट्रातील जनता शिंदे - फडणवीस सरकारच्या कामकाजावर खुश आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, भाजपा महिला मोर्चाची जबाबदारी वेळोवेळी ज्यांनी सांभाळली, त्यांच्या कार्यामुळे महिला मोर्चा सशक्त झाला आहे. तेच काम मी सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार आहे. महिला मोर्चाच्या सदस्यांनी प्रामाणिक कार्य करून संघटन मजबूत करावे. राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार महिलाप्रती संवेदनशील आहे. महिला संदर्भातल्या प्रत्येक घटनेची ते तातडीने दखल घेतात. न्याय देण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत