Top News

यु.पी.च्या धर्तीवर राज्यातही लव्ह जिहाद विरोधात कायदा करा #chandrapur


चित्रा वाघ यांची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी
चंद्रपूर:- महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे.त्यातच बलिकांवरील अत्याचाराच्या घटना कमी नाही.केंद्र शासनासने पोक्सो कायद्यात सुधारणा केली म्हणून थोडा वचक बसला आहे. अत्याचार करणे ही एक प्रवृत्ती आहे. लव्ह जिहाद हा त्यातलाच प्रकार आहे. उत्तर प्रदेशात (यु.पी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा केला. तसाच कायदा महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने करावा अशी मागणी भाजप महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशातील 'लव्ह जिहाद' विरोधातील कायद्याचं समर्थन करतांना रविवारी(13 नोव्हेंबर) पत्रकारांशी संवाद साधतांना केली.
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, राज्य का.सदस्य रेणुका दुधे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, संजय गजपुरे, महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, भाजप नेते वंदना आगरकाटे, लक्ष्मी सागर व वैशाली जोशी यांची उपस्थिती होती.
चित्रा वाघ म्हणाल्या,शिंदे-फडणवीस यांनी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधात कायदा केला पाहिजे. राज्यात मुलींना फूस लावून पळवून नेणे, धर्मांतर करणे,बळजबरीने लग्न लावणे व गर्भवती झाल्यावर सोडून देणे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने यावर लगाम लावणे आवश्यक आहे.समाजातील अश्या वाईट प्रवृत्तीचा विरोध जनतेनेही करायला हवा.असेही त्या म्हणाल्या.
आता शासनाचे 250 निर्णय जनते पर्यंत पोहोचवा

दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर चित्रा वाघ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,यापूर्वी अपशब्द वापरलेल्या अनेक महिलांनी विविध पक्षात प्रवेश घेतला आहे. आणि आज त्या, त्या पक्षाच्या नेत्या म्हणून काम करताहेत, त्यामुळे एकत्रित पणे त्या देखील सरकारचे कामं लोकांपर्यंत पोचविण्यासाठी काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. शिंदे-फडणवीस सरकारने 100 दिवसांत 250 जनहीतैशी निर्णय घेतले. त्याची चर्चा प्रसार माध्यमात नाही. कोणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने