हे गणेशा
बुद्धीदाता विघ्नहर्ता
भक्त तुझा येतो तुझ्या दारी
ठेवतो श्रद्धा तूच असे विघ्नेशा
माथा पडतो तुझ्या मंदिरी
सुखकर्ता दुख:हर्ता
तूच तू रे
भाव भक्ती
वाहतो तुझ्याच पायी
मायबाप माझा तू असशी
तूच देसी या संसारातून मुक्ती
मुर्ती बसलीय ठायी ठायी
मनात माझ्या तू राहशी
गणराया
तूच स्वामी
या तिन्ही जगताचा
कृपादृष्टी। तुझी सदा राही
साथ असताना मज नाही कमी
तू तारणहार सकलांचा
भक्त तुझा वाट पाही
दर्शन दे
हर्षा भुरे, भंडारा