Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मीना बाजारात अपघात #accident

गडचिरोली:- गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनच्या मिना मार्केट पटांगणावर सुरु असलेल्या मीना बाजारातील एक डॉन्सींग झुला सुरु अवस्थेत तुटून पडल्याने एक युवती जखमी झाल्याची घटना बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. दिवाळी झाल्यावर शहरी व ग्रामीण भागात झाडीपट्टीतील नाटके, कव्वाली तसेच मीना बाजार भरणे सुरू होते.
मनोरंजनाचे विविध साहित्य तसेच खाद्य पदार्थांची रेलचेल मिना मार्केट असल्याने नागरिकांसह लहान व तरुण मुले मिना बाजाराकडे आकृष्ट होतात. गडचिरोली शहरातही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अभिनव लॉनच्या परिसरात मिनाबाजार सुरू झाला आहे. यात सदर अपघात घडला. त्यामुळे मिना बाजाराला परवानगी देणार्‍या विभागाने परवानगी देण्याआधी सर्व तांत्रिक बाबींची शहानिशा केली होती का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
बुधवारी, 9 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास गडचिरोली येथे सुरू असलेल्या मिना बाजारतील डान्सिंग झुला तुटला. यावेळी त्या झुल्यावर लहान मोठे अनेक जण बसले होते. या अपघातात एक युवती जखमी झाल्याची खात्रीलायक माहिती असुन सुदैवाने तिला झालेली दुखापत गंभीर नाही. मात्र, हा डान्सिंग झुला तुटल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे तसेच संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत