Top News

मॉडेल कॉलेजचा विकास करायचा असेल तर सर्व पदांना तात्काळ मंजुरी द्यावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विधीसभा सदस्य गुरुदास कामडी यांची मागणी


चंद्रपूर:- आदिवासी बहुल भागाच्या शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने सत्र २०११- २०१२ ला , भारत सरकार द्वारा केंद्र शासन पुरस्करत माँडेल काँलेज (आदर्श महाविद्यालय) आदिवासी बहुल गडचिरोली येथे मंजूर करण्यात आले होते. परंतु महाविद्यालयाला नियमित पूर्णवेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर नसल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती केलेली केलेली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या विकासावर परिणाम होत आहे.

मॉडेल कॉलेजचा विकास करायचा असेल तर नियमित पूर्णवेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर शिक्षकेतर कर्मचारी यांचा आकृतीबंध तयार करून या सर्व पदांना तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे विधीसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन व लेखी निवेदन सादर करुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली आहे.

सदर महाविद्यालयासाठी केंद्र शासनाकडून ८ कोठी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. २ कोटी रुपये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तर ६ कोटी राज्यशासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही महाविद्यालयाचा विकास झाला नाही. सदर महाविद्यालय राष्ट्रसंत तुकडोजी महराज नागपूर विद्यापीठाशी सलंग्नित होते. आक्टोंबर २०११ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची स्थापना करण्यात आली. २०१२ ला केंद्र शासन पुरस्कृत मॉडेल कॉलेज विद्यापीठचे उपकेंद्र गडचिरोली येथे सुरू करण्यात आले. महाविद्यालय सुरू केले परंतू कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ,केंद्र शासन पुरस्कृत मॉडेल काँलेज मध्ये केवळ सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयाला नियमित प्राचार्य, पूर्णवेळ प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पाठ फिरवली. महाविद्यालय विकासाच्या द्दष्टीने महाविद्यालय विकास आराखडा व योजना ,धोरण तयार करण्यात आली नही. परिणामी महाविद्यालयाचा विकास झाला नाही.

गडचिरोली येथे सुरु करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृत मॉडेल कॉलेज मध्ये B.A., B.Com, B.B.A., B.C.A. इत्यादी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. परंतू महाविद्यालयात नियमित प्राचार्य, प्राध्यापक, स्वतंत्र इमारत व सोई सुविधांच्या अभावामुळे केवळ सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे व त्यांच्यातील संशोधनाला चालना देण्यासाठी सदर महाविद्यालय केंद्र शासनाकडून सरु करण्यात आले. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी व संशोधनाला चालना दयाचे असेल तर महाविद्यालयाचा नियोजन बध्द विकास करणे आवश्यक आहे. महाविद्यालय विकासासाठी नियमित पूर्णवेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी या पदांचा आकती बंध तयार करुन त्यास राज्यशासनाने तात्काळ मंजुरी प्रदान करावी.

महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दयावी. स्वतंत्र महाविद्यालय ईमारत, विद्यार्थी वस्तीगह,विद्यार्थीनी वस्तीगह व सुसज्ज ग्रंथालय निर्माण करावे. यासाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून दयावा. केंद्र शासन पुरस्कृत मॉडेल कॉलेज मध्ये संशोधन केंद्र व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. आदी विषयाच्या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना गोंडवाना विद्यापीठ चे विधीसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विधीसभा सदस्य प्रशांत दोंतुलवार, प्रा.धर्मेंद मुनघाटे, यश बांगडे, सौ. किरण गजपूरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने