स्वामी बारमध्ये मुदत संपलेल्या बियरची विक्री #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही

सिंदेवाही:- शहरातील चंद्रपूर-नागपूर मुख्य रस्त्यावर असलेल्या स्वामी बार अँड रेस्टॉरंट मध्ये मुदत संपलेल्या बियरची विक्री करून नागरिकांना पिण्यास देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क तपासणी अधिकारी च्या कार्यप्रणालीवर शक शंका होत आहे.

दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काही व्यक्ती स्वामी बार अँड रेस्टॉरंट मध्ये शहरातील इतर बार च्या तुलनेत स्वस्त दरात वाईन व बियर मिळते म्हणून गेले होते. काउंटर वर किंगफिशरच्या बियर ची रक्कम देऊन बियर घेतली. बियर घेताना अचानक बियर ची चव वेगळी वाटली, बियर अशी का वाटते म्हणून बियर बॉटल च्या लेबल कडे बघितले असता धक्का बसला, स्वामी बियर बार मधुन खरेदी केलेली बियर ची मुदत ही 24-12-2022 रोजी संपलेली होती तरी पन ती दिनांक 27-12-2022 रोजी विक्री करण्यात आली. यावरून स्वामी बियर बारच्या संचालक नी किंगफिशर बियर मुदत गेलेल्या बियर ची विक्री केली असून नागरिकाच्या आरोग्याशी खेळ केला आहे,.


या घटनेची चौकशी व करावाही साठी तक्रार वरिष्ठ विभागा कडे दाखल करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्वामी बार व रेस्टॉरंट सिंदेवाही वर करावाही करण्याची मागणी करीत आहोत. जर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर बार वर करावाही न झाल्यास प्रतिकार म्हणून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या प्रसिद्ध पत्रकाद्वारे देत आहोत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या