Top News

जिल्हा क्रिडा संकुलासाठी लावण्यात आलेले शुल्क रद्द होणार #chandrapur


शुल्क आकारणीला स्थगिती देण्याचे क्रिडा मंत्री यांचे आश्वासन

चंद्रपूर:- चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील गरजू मुले मुली व नागरिक व्यायाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात जातात. 'इन्स्ट्रुमेंट मेंटेनन्स' करण्याच्या नावाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य व केंद्र शासनाने जिल्हा क्रीडा संकुल बांधून उत्तम खेळाडू तयार झाले पाहिजे. त्यांना देश-विदेशात प्राविण्य मिळविता आले. शिवाय आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हे क्रीडा संकुल आहे. त्यामुळे शुल्क घेण्याच्या कोणत्याही जाचक अटी लागू करू नयेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, ललिता रेवल्लीवार, प्रशांत दानव, वीणा खनके, सकीना अंसारी, राजू बनकर, राजेश नायडू, पप्पू देखमूख आदी उपस्थित होते.

शुल्क आकारणीस स्थगितीचे आश्‍वासन

जिल्हा क्रीडा संकुल येथे येणार्‍यांकडून शुल्क घेण्याचा निर्णय क्रीडा संकुलच्या वतीने घेण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांनी हा प्रश्‍न नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. चंद्रपूरला सिंथेटिक ट्रॅक हा शासनाच्या पैशातून तयार करण्यात आला आहे. सध्या पोलिस विभागासह इतर विभागाच्या भरत्या सुरु आहेत. अशात जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी येथे सरावासाठी येणार्‍यांकडून खेळाडूंकरिता 500 रुपये आणि जनतेकरिता 300 रुपये असा मासिक शुल्क आकारलेला आहे. हा शुल्क तात्काळ रद्द करावा, अशी मागणी जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. क्रिडा मंत्री गरीश महाजन यांनी, या प्रकाराची माहिती घेतली.

शुल्क आकारणीबाबत आक्षेप व सूचना आमंत्रित

सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल ग्राउंड वापराची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आकारण्यात आलेल्या शुल्काबाबत किंवा नियमावलीतील नियमाबाबत काही हरकती, आक्षेप व सूचना असल्यास खेळाडू, नागरिक, क्रीडाप्रेमी यांनी लेखी स्वरूपात 10 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे द्याव्यात. आलेल्या सूचना जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ठेवून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत कोणतेही शुल्क तूर्त आकारण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा संकुल समिती यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने