चिमूर:- शेतीच्या वाटणीवरून काकाबद्दल असलेला राग अनावर होऊन पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२७ डिसेंबर) दुपारी चिमुर येथील गांधीवार्डात घडली. प्रभाकर नागोसे (वय ६०) असे खून करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे. तर रूपशे पत्रु नागोसे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.
चिमुरमधील गांधी वार्डातील रहिवासी असलेले मृतक व आरोपी नात्याने चुलते-पुतने आहेत. मृतक प्रभारक नागोसे यांनी, आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचा शेतीचा हिस्सा मृतकाने स्वतःकडे ठेवून घेतला. मृतकास एकही अपत्य नव्हते. तो प्लॉट विक्रीचा व्यवसाय करीता होता. त्या माध्यमातून झालेल्या प्रगतीमधून दोन वर्षापूर्वी त्याने नवीन घराचे बांधकाम केले होते. दिवसेंदिवस होणारी प्रगती ही आरोपी पुतण्या रूपेश नागोसेला सलत होती. त्यामुळे काकाचा तो नेहमी राग करीत होता.
२७ डिसेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी बट्टीबोरी येथून काकाचा वचवा काढण्याच्या उदेश्याने चिमुर येथील घरी आला. मृतक काका हा घरी नसल्याने त्याने सर्वप्रथम त्याचे पत्नीशी भांडण केले. काही वेळाने मृतक प्रभाकर हा घराकडे येताना दिसला. आरोपीने लाकडी दांड्याने काकाला घरात प्रवेश करण्याच्या आधीच डोक्यावर जबर वार केला. एकाच वारात काकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या पत्नीला या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने घटनास्थळावरील रक्ताचे डाग पाण्याने मिटवून पुरावा नष्ट केला.
दरम्यान रेखा आदम हिने केलेल्या तक्रारीवरुन चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पडून असलेला मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.