काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी #chandrapur

Bhairav Diwase

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र


नागपूर:- काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी अशी मागणी आज चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरित केवळ काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ एकच दिवस धावत असल्याने इतर दिवशी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. आजच्या काळात व्यापार उदिम आणि शिक्षणासाठी पुण्यात बरेच नागरिक जा ये करित असतात. मात्र रोज रेल्वे उपलब्ध नसल्याने इतक्या दूरच्या अंतराचा प्रवास नाईलाजाने बसने करावा लागतो किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर रोज धावणारी एक्सप्रेस गाडी असावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी बरीच वर्षे प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.