Top News

सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांचा चंद्रपूर जिल्हा भोई समाज संघाकडून जाहीर सत्कार #chandrapur



चंद्रपूर:- जिल्हा भोई (ढिवर) सेवा संघाचा जिल्हा मेळावा 4 डिसेंबरला एकलव्य मुलांचे वस्तीगृह चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर,आ.किशोरभाऊ जोरगेवार,मा.गजानाराव काबंळे खनिकर्म विकास मंडळ संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.न्यायामुर्ती चंद्रलालजी मेश्राम ,कृष्णाजी नागापूरे चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात सिनेट सदस्य गुरुदास कामडी यानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट निवडणूकीत विजय प्राप्त करुन भोई (ढिवर) समाजाला प्रतिनिधित्व मिळवून दिल्याबद्दल उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

भोई(ढिवर) समाजात जागृती निर्माण करायची असेल तर समाजातल्या तरुण युवकांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समोर आले पाहिजे. जोपर्यंत भोई समाज हा राजकीय राजकीय दृष्ट्या जागृत होत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी शिक्षणाचा मार्ग घेऊन संघर्ष केला पाहिजे. असे आवाहन करण्यात आले.भोई समाजाने आपल्या राजकीय अधिकार आणि हक्का संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

याच मेळाव्यात भोई समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि संशोधन क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या चाळीस व्यक्तींचा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संशोधन कार्यामध्ये प्रा. डॉ. राजेश डहारे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य पदी निवड झालेल्या,व संशोधन व साहसी उपक्रम करणाऱ्या चाळीस व्यक्तींचा या ठिकाणी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे ,श्रीहरी शेंडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने