(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत किशोर आत्राम यांनी मोठ्या हलाखीच्या परिस्थितीत घवखवित यश मिळवले प्रयत्नपूर्वक कामगिरी करत त्यांनी ही परीक्षा पास केली.
जेव्हा ही वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास करायचा घरी कुणीही करता पुरुष नाही स्वतः मेहनत करुन तो अभ्यास करायचा आई चे छत्र हरपले स्वतः स्वयंपाक करून रोज शरद पवार कॉलेज च्या लायबरी मध्ये तो अभ्यास करायचा वडील पण आजारी असायचे ह्या सर्व बाबी बाजूला ठेऊन त्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा चागल्या गुणांनी पास केली. सतत अभ्यास करुन त्यांनी एम पी एस सी मेन्स परीक्षेत लिपिक या पदासाठी त्याची मंत्रालय ह्या परीक्षेत किशोर पात्र झाला. अपंगत्वावर मात करून त्यांनी ही परीक्षा पास झाल्यावर सर्व कोरपना तालुक्यात त्यांना शुभेछा देण्यात आल्या.