चंद्रपूर:- सरकारी कोळसा खाण कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना महाकाली कॉलरी परिसरातील हनुमान मंदिरात उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. दिनेश कुमार कराडे असे मृतकाचे नाव आहे.
दिनेश कुमार कराडे हे चंद्रपूर वेकोली महाप्रबंधक कार्यालयात कार्यरत होते. या घटनेची माहिती शहर पोलिसांना (police) मिळताच पाेलिसांचे पथक घटनासस्थळी दाखल झाले. मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
दिनेश कुमार कराडे यांनी ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास चंद्रपूर (chandrapur) शहर पोलीस करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत