कोलामांचा पाठीराखा हरपला.... #Chandrapur


चंद्रपूर:- कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विकास कुंभारे यांचे अपघाताने निधन झाले. आदिवासीबहूल माणिकगड पहाडावरील कोलाम समाजाच्या संस्कृती व हक्कांविषयी जाणीव-जागृती करुन देण्यात त्यांचे योगदान कुणीही विसरु शकत नाही.

 कोलाम परिषदांचे आयोजन करुन समाजाला कोलामांच्या प्रश्नांवर चिंतन करायला त्यांनी भाग पाडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पहिल्यांदाच कोलामगुड्यावर त्यांनी तिरंगा फडकवला. झेंडावंदन केले. मंत्रीमहोदयांना कोलामगुड्यांवर आणून कोलामांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. या आगामी महिन्यात कोलाम परिषदेचे आयोजन गडचांदूरला करण्याच्या तयारीने ते जिवतीतील कोलामगुड्यांवर बैठका घेवून परतीचा प्रवास करत असतांना त्यांचा अपघात झाला. त्यांनी नुकतीच शेतकरी व कोलामांच्या प्रश्नांवर संशोधन करुन पिएचडी पुर्ण केली होती व पुढील महिन्यात 'आचार्य' पदवीने सन्मानित होणार होते. नौकरी सांभाळत पुर्ण वेळ चळवळीत देत कृतियुक्त काम करणारी अशी माणसं गेली तर समाजाची खूप हाणी होते. त्यांच्या कुटुंबियांसह माणिकगड पहाडावरील उपेक्षित, दुर्लक्षित कोलाम समाजाची ही हाणी आहे. विकासजी कुंभारे या लढणा-या कार्यकर्त्याला भावपूर्ण आदरांजली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत