सायबर पोलीस आता करत आहेत सायबर गुन्हेगारांवर मात:- मुजावर अली #chandrapur

रासेयो शिबिरात स्वयंसेवकांना सायबर क्राईम विषयी माहिती 


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 29 जानेवारीला तिसऱ्या सत्रात सायबर हाईजिन, प्रॅक्टीशनर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर गुन्ह्यांत माहितीची चोरी, इ-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, माहितीचा अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत. तसेच मोबाइल नेटसारख्या क्राइम व इंटरनेट बँकिंग यासारख्या गुन्ह्याचे प्रकार भारतात सर्वाधिक आहे. तसेच काही लोक सायबर सुरक्षेविषयी फारसे जागरूक नाहीत केवळ इंटरनेट असेल, तरच गुन्हे घडू शकतात.  दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही अतिशय चिंताजनक बाब असून, या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. आपण सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये, म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावरील मुख्य उपाय असल्याचे मत मुजावर अली यांनी केले.

पोलीस उपनिरीक्षक रोशन इरचापे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. उषा खंडाळे, प्रमुख वक्ते  मुजावर अली सायबर हाईजिन, प्रॅक्टीशनर, सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर, प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक रोशन इरचापे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन अजय मोहूर्ले, आभार आचल मूरमूरवार हिने केली. तर , रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी  डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या