रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविणे आवश्यक:- किरण मोरे #chandrapur


रासेयो शिबिरात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा वाहतूक नियमांविषयी जनजागृती‎


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 29 जानेवारीला दुसऱ्या सत्रात रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रमुख वक्ते किरण मोरे यांनी म्हणाले की, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच असून अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने रस्ता सुरक्षा नियमांचे पालन तंतोतंत करणे गरजेचे आहे. रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविणे आवश्यक आहे. चालवताना मोबाईलचा वापर न करणे, हेल्मेट वापरणे, सिल्ट बेल्ट लावणे, ड्रिंक्स ॲड ड्राईव्ह करूण गाडी चालवू नये, अति वेगाने गाडी चालवू नये अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.
सुधीर जाधव पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा चंद्रपूर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

या सत्राचे अध्यक्ष डॉ. कुलदीप आर गोंड, प्रमुख वक्ते किरण मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, प्रमुख पाहुणे सुधीर जाधव पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा चंद्रपूर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. निखील देशमुख, मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन दिपक सिन्हा, आभार अक्षता मेश्राम हिने केली. तर रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या