रासेयो शिबिरात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 29 जानेवारीला पहिल्या सत्रात व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते डॉ. वैभव मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन त्यांची समाजाबाबत असणारी जबाबदारी वाढते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सातत्याने तत्पर असतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत म्हणून सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांची भूमिका मोलाची असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. कुलदीप आर गोंड, प्रमुख वक्ते डॉ. वैभव मेहता Data scientist and researcher Indian ambacy Japan, प्रमुख पाहुणे डॉ. संतोष शर्मा संचालक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन आकाश मडावी, आभार हर्षा महासाहेब हिने केली. तर डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत