Top News

चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश तस्करांवर मोठी कारवाई #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची सूत्रे हाते घेताच पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी धडाकेबाज कारवाई करीत अवैध धंदेवाल्यांचे मुसक्या आवळणे सुरू केले आहे. अवैध गो तस्करी करणाऱ्यावर कारवाई केल्याने गो तस्करात खळबळ माजली आहे.

नागभीड हद्दीतून काम्पा मार्गाने 3 मालवाहू आयशर गाड्यांमध्ये अवैध्यरित्या जनावर भरून कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जाणार आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावार यांनी पो. हवा. सुरेंद्र महतो, ना.पो. कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, विनोद जाधव याचे पथक कारवाई करीता नेमून मदती करीता पो.स्टे. नागभीड स.पो.नि. कोरवते, पोउपनि साखरे यांना आदेशीत केले.

सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे बामणी बस स्टॉप समोर साफळा लावून व काही कर्मचारी यांनी नाकाबंदी केली असता. खबरे प्रमाणे काम्पा मार्गे 3 आयचर वाहन येतांना दिसले. सदर वाहन थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये एकूण 47 गोवंशीय जनावर मिळून आले जानावरांची वाहतुक करणारे नामे १) मोहम्मद कासीम मुस्तकीम शेख वय 46 वर्षे रा. शिवानगर वार्ड नागभीड जि. चंद्रपूर 2) समीर अक्रम खान वय 34 वर्षे रा. जाभुळ घाट ता. चिमुर जि. चंद्रपूर 3) सैयद कोसार सैयद सालार वय 38 वर्षे रा. मौलाना आझाद उर्दु शाळे जवळ मंगरुळपर जि. वाशीम 4) अशोक सदाशिव ठोंबरे वय 70 वर्षे रा. बेलखेड ता. मंगरूळपिर जिवाशीम 5) मोहम्मद मोहसिन मोहम्मद रफीक वय 32 वर्षे रा. आसेगांव ता. मंगरूळपिर जि. वाशीम यांना अटक करण्यात आली.

जनावरांची एकूण किंमत 4,70,000/- रू.व. गाडीची. कि. 36.00,000/- रु. असा एकूण 40.70,000/- रू.माल ताब्यात घेतला. नमुद आरोपीतां विरूद्ध पो.स्टे. नागभीड येथे अप.58 / 2023 कलम 5 (अ). 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीय 1978 सुधारीत 2015, सह कलम 11(1) (ड) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पो.स्टे. नागभीड स.पो.नि. कोरवते, पो.उप.नि. साखरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा. सुरेंद्र महतो ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, पो. कॉ. गणेश भोयर, विनोद जाधव व पो.स्टे. नागभीड पो. स्टॉफ यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. नागभीड हे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने