Top News

वनविभागाच्या गस्त पथकाच्या कारवाई


लाखो रुपयांचे सागवान सापडले; दोन ट्रक ताब्यात


भंडारा:- सागवान वृक्षाची कटाई करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर वनविभागाने कारवाई करून 7 लाख रुपयांचे सागवान लाकूड जप्त केले.

ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे घडली. वनविभागाच्या गस्ती पथकाने करून जप्त केलेले लाकूड गडेगाव डेपोत जमा करण्यात आले आहे. अचानक वनविभागाच्या कारवाईमुळे तस्करी करणारे चांगलेचं हादरले आहेत. विशेष म्हणजे वनविभागाने दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये साधारण लाखो रुपयांचे सागवान सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणातला खरा सुत्रधार कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

25 लाखांचा मुद्देमाल जप्त

लाखनी वनविभागाच्या गस्ती पथकाला ट्रकमधून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून ट्रक (क्र. एमएच 40 एके-5317 व एमएच-40 सीडी 0413) यांना थांबवून तपासणी केली असता. 7 लाख रुपयांची सागवान लाकडे भरलेली दिसली. वाहनचालकाजवळ परवाना नसल्याने दोन्ही ट्रक जप्त करून गडेगाव आगारात जमा करण्यात आले आहेत. 7 लाख रुपयांचा सागवान लाकूड व दोन ट्रक असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू असून ट्रकच्या मालकाला अटक करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने