Top News

नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत #chandrapur #gadchiroli #Dhanora



गडचिरोली:- जिल्ह्यातील धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील चारवाही जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत. जवानांनी केलेल्या कारवाईचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

नक्षलवादी फेब्रुवारी ते मे या कालावधीत 'टीसीओसी'च्या (टॅक्टीकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवून आणतात. याच उद्देशाने त्यांनी कटेझरी-चारवाही जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके पुरून ठेवली होती. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने मंगळवरी दुपारी स्फोटके निकामी करीत नक्षल साहित्य जप्त केले.

यात 2 जिवंत ग्रेनेड, 2 हँड ग्रेनेड फायर कफ, 18 वायर बंडल, 5 ब्लास्टींग स्टिल डब्बे, एक प्लास्टिक डबा (टुल किटसह), 4 वायर कटर, 7 ग्रेनेड माऊंटींग प्लेट, एक लहान लोखंडी आरी, 20 नक्षल पुस्तके, 7 टु-पीन सॉकेट आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. यावेळी बीडीडीएस पथकाने जप्त स्फोटके निकामी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने