Top News

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी बघितले ताडोबाचे वाघ! #Chandrapur


चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व तेथील वाघांनी अवघ्या जगातिल वन्यप्रेमींना भुरळ घातली आहे. क्रीकेटपटूही त्यातून सूटले नाहीत. भारतातील दिग्गज क्रीकेटर्स ताडोबात नेहमीच येतात. शिवाय, नागपूरमध्ये सामना असला की विदेशातील क्रीकेटपटूंचीही येथे हजेरी लागते. सध्या ऑस्ट्रेलिया क्रीकेट संघाचा निवृत्त खेळाडू मॅथ्यू हेडन ताडोबा मुक्कामी असून, ताडोबातील जुनाबाई या वाघिणीसोबत तिच्या दोन शावकांनी त्याला दर्शन दिले.

भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सामना नुकताच संपला. या सामन्याला मॅथ्यू हेडन व मार्क वाग्यू हे दोघे हजर होते. यातील हेडन याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते केवळ सामना बघण्यासाठी नागपुरात आला होता. तर मार्क हे ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य आहे. पाच दिवसीय क्रिकेट मॅच तीन दिवसात संपली. यात भारत विजयी झाला. अशात उर्वरित दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी मॅथ्यू हेडन व मार्क हे दोघेही दाखल झालेत. बांबू रिसोर्टमध्ये या दोघांनी मुक्काम केला.

मदनापूर प्रवेशव्दार येथून ताडोबात प्रवेश केला. या दोघांनाही जुनाबाई व तिच्या दोन शावकांनी मुक्त दर्शन दिले. सलग दोन दिवस या दोन्ही क्रिकेटर्सने ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला. दोघांनाही व्याघ्रदर्शन झाल्याने दोघेही आनंदी मनाने परत गेले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने