शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या वास्तुवर पुष्पअर्पण #chandrapur


गोंडराजे बिरशाह व रानी हिराई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण


चंद्रपूरः- शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्था व एफईएस गल्र्स महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विदयार्थीनीनी पुष्पअर्पण केले.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विद्यर्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर चंद्रपुर राज्याचा राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन राजा बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने बांधुन एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत प्राचार्या प्रा डॉ मीनाक्षी ठोंबरे यांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान आपल्या मनोगतात व्यक्त केले. ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविदयालयाच्या डॉ प्रा करुणा करकाडे यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे महत्व विद्यार्थांना सांगितले.

यावेळी आजच्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी,आभार सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ कल्पना कावऴे मनोगत प्रा डॉ आनंद वानखेड़े, प्रा डॉ राजेश चिमणकर, उपस्थितीत प्रा. डॉ सुवर्णा कायरकर, प्रा डॉ प्रज्ञा जुनघरे, प्रा डॉ मिनाक्षी जुमले, डॉ मेघमाला मेश्राम, प्रा रक्षंदा गावंडे, प्रा अशोक बनसोड, प्रा लोकेश दरवे, प्रा शंकर पुरटकर इको-प्रो चे सुमीत कोहळे, सुधीर देव, संजय सब्बनवार, भारती शिंदे, अस्मिता मेश्राम, राजू काहीलकर, सचिन धोतरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत