तुमगांव येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व भारुड चे आयोजन

शिवछत्रपती एकता ग्रुप द्वारा कार्यक्रमाचे आयोजन 

चंद्रपूर:-  मौजा तुमगांव येथे दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव निमित्ताने सकाळी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे व रात्री ८ ते १०:३० वाजेपर्यंत ह.भ.प.श्री. निबांजी महाराज तागड (हिंगणा) यांचे रांगिन संगीत नाथांचे अमृतवाणी भारुड चे आयोजन केले आहे.

 या कार्यक्रमाला मा.ना.श्री. हंसराज भैय्या अहिर माजी केंद्रीय मंत्री , मा.श्री. रामेशजी राजूरकर साहेब सामाजिक कार्यकर्ते वरोरा, मा.श्री . करण संजयजी देवतळे प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा.
मा.श्री.रविंद्रजी शिंदे शिवसेना विधानसभा प्रमुख, मा.श्री. राजुभाऊ गायकवाड मा.अर्थ व बांधकाम सभापती , मा.श्री. अहेतेशामजी अली माजी अध्यक्ष न. प.वरोरा. मा.श्री.नितीन भाऊ मत्ते.जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना. मा.श्री.मंगेश भाऊ भोयर उपसरपंच नंदोरी. सौ.दुर्गा ताई तोडासे सरपंच तुमगांव.प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या होणाऱ्या रक्तदान शिबिर व भारुडास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवछत्रपती एकता ग्रुप चे युवा अध्यक्ष आकाश मेश्राम,उपाध्यक्ष आशिष भुते व सचिव यश काकडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या