शिक्षणक्षेत्रात पालकांची लुट विरोधात मनसेचे तीव्र आंदोलन #chandrapur

Bhairav Diwase
0

मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन


चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी खाजगी शाळांची एका रेडीमेड दुकान दारासोबत मिलीभगत करून पालकांची होत असलेल्या लुट विरोधात शहरातील जटपुरा गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जटपुरा येथे खाजगी शाळा, शिक्षण विभाग, महानगरपालीका विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली

चंद्रपूर शहरातील खाजगी शाळा गणवेश केवळ एकाच दुकानात उपलब्ध आहे. यात खाजगी शाळा चालक व रेडीमेड दुकानदाराची मिलीभगत व टक्केवारी असल्याने रेडिमेड दुकानदाराच्या इशाऱ्यांवर दर दोन वर्षाने शाळेच्या गणवेशात छोटे मोठे बदल केले जाते यामुळे खाजगी शाळांचे गणवेश केवळ चंद्रपूर शहरातील आंबेडकर पुतळया जवळील मुख्य मार्गावरील एका रेडिमेड दुकानात पालकांना घ्यावे लागते, एकाच मुलाल तीन ड्रेसेस घ्यावे लागते यामुळे गरीब पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. या रेडिमेड दुकानात एकाच वेळी मुलांची पालकांसह गर्दी होते दुकान छोटे असल्याने एखादेवेळी चेंगराचेंगरी सारखी घाटना होऊ शकते. याबाबत मनपाला रेडिमेड दुकानाला योग्यपरवानगी जागेबाबत तक्रार करूनही कारवाई केली नाही गणवेशातून केली जाणारी लुट बाबत शिक्षण विभागाला तक्रार देण्यात आली, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने मनसेने आज निदर्शन आंदोलन केले. यानंतरी पालकांची गणवेशाच्या माध्यमातून लुट करणे न थांबविल्यास मनसे रेडीमेड दुकान, शिक्षण विभाग, खाजगी शाळासमोर या पुढील तीव्र आंदोलन करणार असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मंनदिप रोडे यांनी यावेळी दिला.


यावेळी आंदोलनात मनसेचे राहुल बालमवार जिल्हाध्यक्ष, प्रतीमा ठाकुर महिला जिल्हाध्यक्ष, मायाताई मेश्राम, विधी सेना जिल्हाध्यक्ष मंजू लेडांगे, शेतकरी सेना अध्यक्ष अनंत बावणे, शहर सचिव सुमित करपे, शहर संघटक राहुल मडावी, वाहतुक सेना भरत गुप्ता, नितेश जांभुडकर, रवी भसारकर, असलम खांन, जफर शेख, राकेश हनूमंते, शहर उपाध्यक्ष महेश यासलवार, प्रकाश बोरकर, नीतीन बावणे, संदीप उरडे, रोशन बत्की, कूलदिप चंदनखेडे, अक्षय चौधरी निलेश कूरेकार, बंटी कास्तावार, राम सारस, राज वर्मा, मनोज तांबेकर, विक्की हत्ती मारे, कीशोर मडगुलवार, श्रीकांत सुंदर गीरी, वसीम शेख, प्रशांत खामत, अजय दामेरी, शहरूख शेख, संगीता धात्रक, क्रीष्णा सूरमवार, शीवगंगा मट्टपती, वानी सादलवार, लता खापरडे, आदि मनसे सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)